पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे काय? व पावसाळ्यातील आरोग्यदायी १२रानभाज्यांची ओळख

0

पावसाळा सुरू झाला की, शेतात नवीन लागवडीची गडबड सुरू होते. भाज्यांचे प्रमाण कमी होते, तसही या दिवसात भाजी ओली, चिपचिपीत होते परिणामी कडधान्ये जास्त खाल्ली जातात. परंतु काही भाज्या फक्त पावसाळ्यात विनासायास उगवून येतात त्या आरोग्यदायी असतात या भाज्यांना रानभाज्या संबोधले जाते. तर रानभाज्या म्हणजे नेमके काय? रानभाज्या म्हणजे डोंगरावर किंवा उजाड रानावर पावसाळ्यात नेमाने आपोआप उगवून येणाऱ्या भाज्या होय. यांची कसलीही लागवड होत नाही, गत किटनाशक वापरली जात नाहीत तर त्या आपोआप उगवून येतात. या भाज्या खुडून ग्रामीण भागात सर्रास वापरल्या जातात किंवा बाजारात विकल्या जातात. या भाज्यांचे आरोग्यदायी फायदे आश्चर्यकारक आहेत. या भाज्यांची माहिती तरुण शहुर पिढिला व्हावी याकरता महोत्सव घेतले जातात. तर आज आपण १२ आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख करून घेणार आहोत.

१) कुलूची भाजी – ही भाजी पावसाच्या पहिल्या सरसत येते. या भाजीची कोवळी पाने खुडून कांदा, लसूण, मिरची घालून भाजी करतात.
२) करटोली – ही फळभाजी कारल्यासारखी दिसायला व चवीला असते ती बनवलीही तशीच जाते. की, सर्दी दूर होते.
३) करडू – या भाजीचीही कोवळी पाने खुडून गोळा भाजी केली जाते. ही भाजी कफावर उत्तम आहे.
४) टाकळा – ही भाजी मेथीच्या भाजीप्रमाणेच केली जाते. चवीला तुरट असते. वात, त्वचाविकार यांवर उपयुक्त असे.
५) दिंडा – या भाजीची कोवळी पान खुडून गोळा भाजी केली जाते.
६) भारंग – या भाजीची सकी भाजी केली जाते. या भाजीत लोह असते परिणामी रक्तातील हिमोग्लोबीन वाढते.


७) मायाळू – ही एक वेलवर्गीय भाजी असून याची गोळा भाजी करतात. पचायला हलकी असून पित्तनाशक व सांधेदुखी दूर करते.
८) अळू – अळूच गरगट, वडी तयार करतात. गौरीच्या नैवद्यात दाखवतात.
९) शेवडा – शेवड्याची दांडी फुलोरा धरते हा फुलोरा आतून गुलाबी व बाहेरून तपकीरी असतो, याची कांदा पातीप्रमाणे भाजी करतात.
१०) वेलवर्गीय भाजी असून कोवळी पाने खुडून भाजी करतात. पोटाच्या तक्रारीत उपयोगी आहे.
११) आघाडा – दुर्वेबरोबरच आघाडा देवाला दाखवतात. याच आघाड्यात विटामिन ए, अँटी बायोटीक असतात तसेच मूळव्याध, मूतखड्यावर औषधी ठरते. कोवळी पाने खुडून डाळ, कांदा घालून भाजी करावी.

या रानभाज्यांची चव निरनिराळी असते. तुरट, आंबट, गोडसर, खाजरी, कडू या भाज्या शिजवायची पद्धतही वेगवेगळी आहे, अजूनही रानभाज्या आहेत. आपण काही भाज्यांची माहिती घेतली असून तुम्हाला ती आवडली असल्यास आमच्या पेजला लाईक करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.