पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त,भाजपच्या महेश जाधवांना हटवले

0

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर,जोतिबा तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील 3 हजार 64 मंदिरांचा समावेश असणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सध्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.समितीने केलेल्या वारेमाप खर्चामुळे देवस्थान समितीवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू होती.अखेर न्याय विधी खात्याने ही समिती बरखास्त केली असून पुढील 1 वर्ष समितीचा कारभार जिल्हाधिकारी दौलत देसाई पाहणार आहेत.तक्तालीन अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचा कार्यकाळ 2010ला संपला त्यानंतर 2010ते2017 तब्बल सात वर्ष हा कारभार जिल्हाधिकारी पाहत होते परंतु भाजपच – शिवसेना युती सरकार आले व त्यात देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे महेश जाधव तर कोषाध्यक्षपदी राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असून दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार येताच भाजपचे पदाधिकारी असलेली मंडळे बरखास्त करून तेथे महाविकास आघाडीच्या सदस्यांची नियुक्ती झाली होती.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची नियुक्ती प्रलंबित राहिली होती,समितीवर जमीन मोजणीसह,वारेमाप खर्च, भ्रष्टाचार असे आरोप झाले होते.या सगळ्या तक्रारी न्याय व विधी खात्याकडे गेल्या होत्या.न्यायालयातही दावा दाखल करण्यात आला होता.या सर्वांवर बुधवारी रात्री घडामोडी होत न्याय व विधी खात्याचे सचिव संजय देशमुख यांनी समिती बरखास्त केली.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती महत्त्वाची असून राज्यातील महत्वाच्या मंदिरांचा यात समावेश आहे.कोल्हापूरच्या आंबाबाईला कर्नाटक,आंध्रप्रदेशातूनही भाविक येत असतात.दरम्यान देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी सध्या राष्ट्रवादीचे भैय्या माने व पालकमंत्री सतेज पाटील यांचे बंधू संजय पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.