
आ.निलेश लंके यांच्या उपस्थित कोविड सेंटरमध्ये लग्न : खर्चची रक्कम केली कोविड सेंटरला दान!
अहमदनगर जिल्ह्यात एक आगळे वेगळे लग्न पार पडले आहे. आपल्या विवाहाच्या माध्यमातून एक नवा आदर्श उभा करत आपल्या लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत या नवविवाहित दांपत्याने नवा आदर्श लोकांच्या समोर उभा केला आहे. हा विवाह सोहळा पारनेर तालुक्यात पार पडला.
हा विवाह सोहळा पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या “शरद पवार आरोग्य मंदिर” या कोविड सेंटरमध्ये संपन्न झाला. वधू वर यांनी अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे तसेच राजश्री काळे व जनार्दन पुंजाजी कदम यांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात कोविड सेंटरममधून केली आहे.
थाट करत लग्न करण्याच्या काळात हे लग्न एक नवा आदर्श निर्माण करत आहे. अनावश्क खर्च टाळून सर्व रुग्णांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट, अत्यावश्यक औषधे आणि ३७००० रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कोरोना रुग्णांचा आशीर्वाद घेत नवीन जीवनास या नव दाम्पत्याने सुरुवात केली.