आम्ही पण विरोधी पक्षात होतो पण कधी विधान भवनाच्या आवारात चुकीचं वागलो नाहीत – जयंत पाटील

0

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवसा सत्ताधारी विरुद्ध विरोधक कसा चांगलाच गाजला या ठिकाणी विरोधी पक्षातील आमदारांनी राज्याच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये तालुका अध्यक्ष यांना शिवीगाळ केली तथा सभागृहांमध्ये धक्काबुक्की झाली यामुळे भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले.

हे निलंबन भारतीय जनता पक्षाच्या चांगलं जिव्हारी लागल आहे. यावरून आक्रमक होत विरोधी पक्षाने टीका केली आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांची बारा निलंबित आमदारांनी भेट घेतली. तसेच याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सभागृहात न जाता पायऱ्यावर प्रतिविधानसभा भरवली.

यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करुन टिका केली आहे, यात पाटील म्हणाले की, “मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधी विधान भवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.”

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.