“करोनाविरुद्धच्या युद्धात हातात हात घालून काम केलं पाहिजे”- संजय राऊत

0

मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांच्या संख्येत उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात करोना प्रतिबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, राज्यभरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की काल राज्य सरकारवर आली.

दुसरीकडे इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली वानवा, अशा अपुऱ्या आणि तोकड्या आरोग्य सोयी-सुविधांमुळे आरोग्य प्रशासनाचा गोंधळ उडालेला आहे.

दरम्यान, यावरून सध्या केंद्र आणि राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात खडाजंगी सुरु आहे. राज्यातील या परिस्थितीवरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत.

या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वपक्षीयांना, पुढच्या काही काळासाठी राजकीय प्रश्न बाजूला ठेवून, सगळ्यांनीच करोनाविरुद्धच्या युद्धात उतरलं पाहिजे असे, आवाहन केले आहे.

तसेच त्यांनी विरोधकांना, करोनाच्या स्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, खासकरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे टोमणा मारून मदतीचे आवाहन केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.