
केसांची झटपट वाढ होण्यासाठी सोपे घरगुती उपाय
लांबसडक केस स्त्रीचे सौंदर्य वाढवतात. अशा लांबसडक केसांमुळे स्त्रीयांना त्याची निगाही तशीच ठेवावी लागते. परंतु अनेक स्त्रियांना केसांच्या समस्या दिसून येतात. ज्यात केसाला फूट फुटणे, केस गळून, इ समस्या दिसून येतात. अशा प्रकारच्या समस्या दूर होऊन केस लांबसडक वाढण्याचे उपाय आपण पाहणार आहोत.
१) केस वाढवण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त असून कांद्यात असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला मदत मिळते. १ लाल कांदा घ्या त्याचे ४ तुकडे करून मिक्सरमधून बारीक करा. रुमालाच्या मदतीने ज्यूस गाळून घ्या. हा रस केसांच्या मुलांना लावा १५ मिनिटांनी केस धुवून टाका.
२) कोरफड गर केसांच्या मुळाला व १५ ते २० मिनिटांनी धुवून टाका.
३) केसांच्या वाढीसाठी अंड्याचा पांढरा बलक लावा व हा लावलेला बलक २० मिनिटांनी धुवून टाका.
४) आवळा केसांसाठी फायदेशीर असून आल्यात अनेक पोषक तत्वे असतात. हा आवळ्याचा रस केसांच्या मुळांना लावल्यास केस जलद वाढतात.
५) मजबूत केस वाढवण्यासाठी शिकेकाई लावा.
६) मेथीचे दाणे आणि दही एकत्र मिसळून १५ मिनिटांनी धुवून टाका.
वरील उपाय आठवड्यातून दोनदा करा. या उपायांमुळे केसांच्या समस्या दूर होऊन केस लांबसडक वाढतात.