
Virat Kohli : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीचा आज 34 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अनुष्काने विराट साठी एक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र विराट आणि अनुष्का पहिल्यांदा कुठे व का भेटले आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट 2013 मध्ये एका जाहीरातीच्या शुटिंग दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. ज्यावेळी विराट आणि अनुष्काची भेट झाली होती. विराटने सांगितले की, तो सेटवर चिडलेला आणि घाबरलेला होता. यानंतर विराटने अनुष्कासोबत विनोद केला. तो क्षण आठवताना विराट म्हणाला की, “अनुष्का आत गेली आणि माझ्यापेक्षा उंच दिसत होती. मी तिला म्हणालो, ‘तुम्हाला यापेक्षा उंच टाचांची जोडी मिळाली नाही का?’ यावर अनुष्का ‘माफ करा?’ असं म्हणाली यावर विराट ‘मी फक्त विनोद करत आहे!’ असं म्हणला.
2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. कारण दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र दिसायला लागली. यानंतर डिसेंबर 2017 मध्ये दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं होते.
सोबतच, आज तुझा वाढदिवस आहे माझ्या प्रिय, म्हणून साहजिकच, मी या पोस्टसाठी तुझे सर्वोत्तम कोन आणि फोटो निवडले आहेत प्रत्येक स्थितीत आणि रूपात आणि मार्गाने तुझ्यावर प्रेम करतो, अशी पोस्ट करत अनुष्काने विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.