संघर्षाची धगधगती तोफ थंडावली, विनायक मेटेंचे अपघाती निधन

0

मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात दुःखद निधन झाले आहे. ते पुण्याहून मुंबईला जात असताना पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. त्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले आहे. मुंबईत आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते.

विनायक मेटे यांना 6.20 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. पल्स नव्हते. बीपीही नव्हता ईसीजीमध्ये फ्लॅट लाईन दिसून आली होती. त्यांना आणलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता.ऑन द स्पॉट मृत्यू झाला, असं म्हणणं घाईचं ठरेल. पाच वाजून पाच मिनिटांनी अपघात झाला. पोलिसांना लिव्हर,छाती आणि डोक्यात मार लागला होता. ब्रेनस्टेम इंजरीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पोस्टमॉर्टेमनंतर सविस्तर कळेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

विनायक मेटे हे मराठा आरक्षणासाठी अहोरात्र लढणारे नेते होते. आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे यांच्यावर वयाच्या ५२व्या वर्षी काळाने घाला घातल्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.