विमल पानसुपारीचा सर्वात पहिला ब्रँड अँबॅसिडर होता “हा” मराठी अभिनेता

0

हल्ली प्रत्येक ब्रँड मोठा होण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतो तो एक प्रसिद्ध चेहरा. मग तो एखाद्या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याचा, अभिनेता चा असतो किंवा एखाद्या खेळातल्या प्रसिद्ध खेळाडूचा. पण अशे मोजकेच ब्रँड असतात जे नवीन चेहऱ्यांना संधी देतात आणि नवीन चेहरे ब्रँडना एका उंचीवर घेऊन जातात, सोबतच ते चेहरे देखील प्रसिद्ध होतात, अशीच एक कहाणी आहे या अभिनेत्याची.

मिलिंद गुणाजी हा गुणी अभिनेता आणि हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला किंवा मराठी माणसांना नवे नाही. सह्याद्रीची भटकंती करत, सह्याद्रीची अनेक नवनवीन रूपं त्यांनी प्रेक्षकांसमोर आणली. त्याचसोबत महाराष्ट्रातील दुर्लक्षित गडकिल्ले, प्रेक्षणीय स्थळे, यांचीसुद्धा सफर “याची देही याची डोळा” घडवून आणल्याची प्रचिती त्यांनी महाराष्ट्राच्या घराघरातल्या माणसांना दिली.

पण ते अपघातानेच या क्षेत्राकडे वळले. महाविद्यालयीन काळात त्यांना डॉक्टर बनायची प्रचंड इच्छा होती. पण कमी गुण आले आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. त्यांची शरीरयष्टी आकर्षक असल्यामुळे, मित्रांच्या सल्ल्याने त्यांनी नंतर मॉडेलिंग सुरु केली.

आणि याच दरम्यान अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे झाले. मॉडेलिंग वेळी त्यांनी प्रसिध्द फोटोग्राफर गौतम राजध्यक्ष यांच्याकडून एक फोटोशुट करून घेतलं. गौतम राजाध्यक्ष यांनी फक्त मिलिंद गुनाजींचं फोटोशुट न करता  मिलिंद गुणाजींचा चेहरा हा जाहिराती बनवणाऱ्या लोकांनाही सुचवला.

या संधीनंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. दरम्यान, जाहिरातींमधून त्यांच्या बिअर्ड लुकची चांगलीच चर्चा झाली आणि ती लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. कालांतराने ते मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत दिसू लागले. अजय देवगणच्या आधी आणि सगळ्यात पहिले विमल या ब्रांडचे मॉडेल मिलिंद गुणाजी होते. छोट्या पडद्यावर मिलिंद गुणाजी तुफ्फान लोकप्रिय होते.

तीच लोकप्रियता त्यांना हिंदी-मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांमध्ये देखील मिळाली. त्यांच्यामुळे हिंदी चित्रपटात दाढीवाल्या नायकाचा ट्रेंड सुरु झाला. त्यांची खासियत म्हणजे त्यांची दाढी होती आणि गंमत म्हणजे ज्या चित्रपटाचा दिग्दर्शक त्यांना दाढी काढण्यासाठी सांगायचा, तो चित्रपट ते सोडून द्यायचे. असे अक्षरशः कितीतरी चांगले चित्रपट त्यांनी या हट्टापायी सोडून दिले आहेत.

गुणाजी यांनी सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्रातल्या अनेक गडकिल्ल्यांची अतिशय मनमोहक अशी छायाचित्रे टिपली आहेत. भटकंती आणि प्रवास या विषयावर मिलिंद गुणाजींनी बारा पुस्तकं लिहिली आहेत. उत्तम फोटोग्राफर आणि भटकंतीची आवड असलेला हा माणूस छोट्या पडद्यावर आजही लोकप्रिय आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.