इमारतीतील रहिवाशाला मारहाण, पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाचा व्हिडीओ व्हायरल

0

पुण्यामध्ये भाजपा नगरसेविकेचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशाला मारहाण केली आहे असा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे तसेच नगरसेविका यांच्या नातेवाईक यांनीसुद्धा पोलिसांमध्ये तक्रार केली आहे दोन्ही बाजूने तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

ही घटना पुणे शहरातील औंध परिसरात घडली असल्याचे समजते आहे यासंदर्भात एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडिया वरती चांगलाच व्हायरल झाला आहे. औंध येथील भाजपा नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती मधुकर मुसळे व भाऊ यांच्यावरती मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. मुसळे या औंध परिसरातील क्लोरियन पार्क या इमारतीत वास्तव्यास आहेत. मारहाण झालेली व्यक्तीही याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे.

त्या व्हिडीओ मधील संवाद पुढील प्रमाणे आहे. “सोसायटीत आपली बदनामी करणारी पत्र का वाटली? त्यावर तुझीच सही आहे ना?” असा जाब मुसळे विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ मारहाणीसोबतच शिवीगाळ झाल्याचंही ऐकू येत आहे. तर “मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी सांगेन” असं संबंधित रहिवासी बोलताना ऐकू येतं.

या प्रकरणाला पुढे नेमके कसे वळण लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे नेमकी माहिती पोलीस कसे मिळतील या बाबतीत पण चर्चा सुरू आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.