Video | अन्ना दुराईंच्या रिक्षात आयपॅडसह टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स अन् बरंच काही, व्हिडीओ एकदा पाहाच!

0

सोशल मीडिया म्हणजे भन्नाट गोष्ट आहे, कधी कोणाला प्रसिद्धीच्या झोतात आणेल आणि कधी कोणाची प्रसिद्धी संपुष्टात आणले हे सांगताच येत. सध्या असाच एक रिक्षावाला सोशल मीडिया वरती चांगलाच गाजत आहे. त्याची माहीत समोर आली असून तो चेन्नईमधील अन्ना दुराई असून त्याची रिक्षा भलतीच प्रसिद्ध आहे. दुराई यांच्या रिक्षामध्ये नेमकं काय आहे, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अन्ना दुराई यांच्या रिक्षामध्ये नेमकं काय आहे? असे या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. हा व्हिडिओ ऑफिशियल ह्युमन्स ऑफ बॉम्बे (Official Humans Of Bombay) या इन्स्टाग्राम पेजवर रिल्सच्या माध्यमातून अपलोड करण्यात आला आहे.

या रिक्षामध्ये नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण एकदा पाहू या – प्रवाशांसाठी मास्क, सॅनिटायझरची सोय, सोबतच रिक्षामध्ये मिनी फ्रिजसुद्धा लावण्यात आले आहे. प्रवाशांना कंटाळा येऊ नये म्हणून टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स, तसेच आयपॅडसुद्धा या रिक्षामध्ये ठेवण्यात आला आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान अतिशय आरामदायी आणि समाधान वाटत आहे. रिक्षाचे भाडे देण्यासाठी त्यामध्ये Card Swapping Machine सुद्धा लावण्यात आले आहे. अशा बहुतांश सुविधांनी ही रिक्षा सुसज्ज आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.