ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन …

0

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला ओम प्रकाश सैगल (रा. जावळकर) यांचे रविवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.शशिकला यांच्या जाण्याची बातमी सर्वप्रथम फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी दिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. बॉलीवूडचा सुवर्णकाळ म्हणून ज्या काळाचा उल्लेख केला जातो, अशा ७० च्या दशकात आपल्या अभिनयाने शशिकला यांनी लक्ष वेधून घेतले होते.

महाराष्ट्रातील सोलापुरात जन्मलेल्या शशिकला जावळकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी स्टेजवर अभिनय करण्यास सुरुवात केली. बालपण मोठ्या कुटूंबात गेलेल्या शशिकला यांना लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्न होतं. वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती. वडील दिवाळखोर झाल्यानंतर, त्या आपल्या कुटूंबासह बॉम्बे (आत्ताचे मुंबई) येथे स्थायिक झाल्या. आणि चित्रपटांमध्ये काम शोधू लागल्या.

१९४५मध्ये दिग्गज अभिनेता नूरजहांचे पती सय्यद शौकत हुसेन रिझवी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झीनत’ या चित्रपटात त्यांनी काम करून प्रथमच मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. शशिकला यांनी जवळजवळ दशकभर वेगवेगळ्या चित्रपटात लहान भूमिका निभावली आणि त्यानंतर त्यांनी वि.शांताराम यांच्या “तीन बत्ती चार रास्ता” आणि शम्मी कपूर याच्या बरोबर १९५५ मध्ये ‘डाकू’ या चित्रपटात काम केले. १९५९ मध्ये जेव्हा त्या बिमल रॉय यांच्या “सुजाता”  या जातीवादाच्या संबधित हिंदी चित्रपटांमधून दिसल्या, तेव्हा त्यांच्या कारकिर्दीला वेग आला. त्यानंतर शशिकला ताराचंद बड़जात्याच्या “आरती” यात १९६२ मध्ये दिसल्या . ज्यामध्ये मीना कुमारी, अशोक कुमार आणि प्रदीप कुमार मुख्य भूमिकेत होते.  पुढे त्या “गुमराह, वक्त, अनुपमा, फुल और पत्तर , सारख्या चित्रपटात अभिजात वर्गातील भूमिका साकारताना दिसल्या.

त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटी, त्यांनी “खुबसूरत” (१९८०), “अर्जुन” (१९८५), “खामोश निगेहेन” (१९८६), “घर घर की कहानी” (१९८८) , “सच” (१९८९) , गोविंदाचा “परदेशी बाबू” (१९९८), शाहरुख खान अभिनीत “बादशाह” (१९९९), करण जोहर दिग्दर्शित “कभी खुशी कभी गम”, संगीत हिट “झंकार बीट्स” (२००३ ) आणि “मुझसे” शादी करोगी “(२००४) आणि २००५ मध्ये” पद्मश्री लालू प्रसाद यादव” यासारख्या अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.

आपल्या अभिनयानं एक वेगळं स्थान निर्माण करणा-या शशिकला यांच्या अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर कायम होती. हसरा चेहरा, कामातील उत्साह, आणि नवोदितांना सतत पाठींबा देण्यात शशिकला यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीतुन मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. आपल्या अभिनयानं एक वेगळी उंची त्यांनी गाठली होती.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.