
कोणत्याही गोड पदार्थात सुगंध आणि रुची वाढवण्यात वेलदोडे मदत करतात. वेलची श्रीखंड, बासुंदी, खीर पदार्थाची लज्जत वाढवतात. वेलदोडे मसाल्यातही वापरले जातात. वेलचीचा सुगंध दूरपर्यंत पसरतो. वेलदोडे उष्ण हवामानातील रोप आहे. वेलदोडे तामिळनाडू, केरळ इत्यादी भागात घेतले जाते. वेलदोडे मुख दुर्गंधीही दूर करतात. वेलदोडे आपण घरातही उगवू शकतो साधारण महाराष्ट्र तसा उष्ण असून काही प्रदेश सोडताच हवामान बर्यापैकी उष्ण असते. चला बघूया वेलचीचे रोप कसे उगवावे.
आपल्याला हिरवी दाणेदार वेलची घ्यायची आहे. वेलचीचे दाणे काळेभोर व टपोरे असावेत अशा प्रकारच्या १५ ते १६ वेलची घ्या. वेलची सोलून घ्या व ती पाण्यात ५ ते ६ तास भिजत घाला. दरम्यान चार डिस्पोजेबल ग्लास घ्या, त्याला तळभागात सुईने ५ ते ६ छिद्रे पाडा. आता या चारही ग्लासमध्ये माती भरा. वेलचीचे दाणे टिश्यू पेपरवर पसरा तो नसल्यास साधा कागद घ्या. वरून दुसर्या कागदाने वेलची टिपून घ्या. चारही ग्लासमध्ये प्रत्येकी ४ वेलची दाणे पसरून टाका. वरून माती पसरा व पाणी स्प्रिंकल करा. चारही ग्लास उन्हात ठेवा.
साधारण १० ते १५ दिवसात वेलचीला अंकुर फुटतील. दररोज दिलसातून एकदा पाणी घाला ही रोप साधारण मार्च एंड ला लावा. उष्णतेने रोपे चांगली वाढतात. २० ते २५ दिवसात रोपे तग धरून वर येतील. ही रोपे उन्हातच ठेवा. रोज पाणी घाला.