
आग दुर्घटनेतील पीडितांना वरूण धवनची आर्थिक मदत.
बॉलीवूडचा चॉकलेटबॉय अभिनेता वरूण धवन नुकताच नताशा दलालसोबत विवाह बांधणात अडकला आहे. सध्या ‘भेडीया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असूनही तो नताशासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. ‘भेडीया’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वरूण अरुणाचल प्रदेशमध्ये गेला आहे. त्याच्यासोबत नताशा देखील गेली आहे. या चित्रपटात वरूणसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिषेक बॅनर्जी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शूटिंग दरम्यान वरूण आणि नताशाने एक गोष्ट अशी केली, ज्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरूण आणि नताशाने अरूणाचल प्रदेशमधील ताराप जिल्ह्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्या पिडीतांसाठी 1 लाख रूपयांची मदत केली आहे.
नुकताच ‘डिप्रो झिरो’ संस्थेने वरूण आणि नताशाचा फोटो पोस्ट केला आहे. डिप्रो झिरोने शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘भेडीया’ चित्रपटाची टीम म्हणजेच कृती सेनॉन, अभिषेक बॅनर्जी, अमर कौशिक आणि एकत्र बसून गप्पा मारताना दिसत आहेत. वरूण आणि नताशा यांनी अरूणाचल प्रदेशमधील ताराप जिल्ह्यात झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्या पिडीतांसाठी 1 लाख रूपयांची मदत केली आहे. यावेळी मदत देताना वरूण आणि नताशाने पारंपारिक वेषभूषा परिधान केली होती.
या जोडीने ‘भेडीया’ चित्रपटाच्या शूटींग दरम्यानच्या मजा मस्तीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. तसेच अरूणाचलमध्ये फिरताना आणि बोटींग करतानाचे फोटो देखील त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. अमर कौशिक यांनी यापूर्वी स्त्री या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.आणि त्यांच्या या चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद भेटला होता.
‘भेडिया’ हा चित्रपट हॅारर कॉमेडी चित्रपट आहे. आणि अशा प्रकारच्या चित्रपटात वरूण धवन पहिल्यांदाच काम करताना पाहिला मिळणार आहे. त्यामुळे वरूणची या चित्रपटातील भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.