“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक नाही, याआधीच सेनेनं…”; वैभव नाईकांची पहिली प्रतिक्रिया

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत नवीन मंत्र्यांना संधी आहे; तर काही मंत्र्यांना घरी बसवण्याची संधीसुद्धा त्यांनी सोडलेली नाही. महाराष्ट्र राज्यांमधून नारायण राणे यांना  कॅबिनेट मंत्री होण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी बुधवारी शपथ घेतल्यानंतर त्यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून हे मंत्रालय यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे होते.

 

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की नारायण राणे यांची लागलेली वर्णी ही शिवसेनेला शह देण्यासाठी आहे. कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या मंत्रीपदावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे आणि वैभव नाईक यांच्या मध्ये असणारं राजकीय वैर सर्वश्रुत आहे.  वैभव नाईक म्हणाले की “राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी सेनेला फरक नाही. याआधीच सेनेनं, कोकणानं राणेंना धडा शिकवलाय,” अशा शब्दांमध्ये वैभव नाईक यांनी राणेंच्या नियुक्तीने कोकणाच्या राजकारणात विशेष फरक पडणार नसल्याचे म्हणत चांगलीच टीका केली आहे. ही माहिती न्यूज १८ ने दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.