१८वर्षांवरील सधन आर्थिक गटाने लस विकत घ्यावी,आरोग्यमंत्री राजेश टोपेंच मत

0

राज्यात कोरोना स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बैठक घेत असून त्यात कोरोना रुग्णांसाठी बेड,आॅक्सीजन पुरवठा तसेच रेमेडिसीवर तुटवडा यांसह कालच्या नाशिकमधील आॅक्सीजन गळतीच्या घटनेवर चर्चा केली जाणार आहे.

राज्यात कडक लाॅकडाऊन लावण्याविषयीही निर्णय घेण्याची शक्यता आहे.दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रान १मेपासून १८वर्षांवरील सर्वांना लस घेण्यास परवानगी दिली असून त्यासंदर्भात राजेश टोपेंना विचारले असता,त्यांनी सांगितले २४ एप्रिलपासून राज्याच्या अॅपवर लसीकरणांसाठी नोंदणी केली जाईल व १मेपासून लसीकरण सुरू होईल.

राजेश टोपे पुढे म्हणाले,या गटातील सधन वर्गाने लस विकत घेऊन लसीकरण करून घ्यावे.परदेशातूनही लसी मागवण्याचा विचार सुरू असून त्यासाठी केंद्राची परवानगी लागेल तसेच या लसी आपल्या लसींपेक्षा अत्यंत महाग आहेत.परंतु राज्यात लसीचा तुटवडा जाणवत असून सिरमला काही लसींचा डोस हा ब्रिटनला द्यावाच लागेल.परिणामी लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल व लसींचा दरही ठरवण्यात येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.