मुंबईतील लसीकरण केंद्र बंद, लसींचा झालाय तुटवडा

0

देशात सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून सिरम आणि भारत बायोटेक अशा दोन्ही संस्थांच्या लसींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.सुरुवातीला 60वर्षांवरील नागरिकांच लसीकरण झाल नंतर आर्युमर्यादा कमी करण्यात आली व सध्या 47 वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू होते,त्यासाठी विविध केंद्रही देण्यात आली होती, परंतु आज शुक्रवार दिनांक 9 रोजी मुंबईसह राज्यातील इतर भागात लसीकरण बंद करण्यात आल, परिणामी पात्र नागरिक संतप्त झाले.

मुंबईत सध्या बीकेसी, चेंबूर व इतर भागातील लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे.आज सकाळीही लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी केंद्रावर रांगा लावल्या होत्या, दरम्यान लसीकरण केंद्र लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळ बंद करण्यात आली.परिणामी सकाळी लवकर नंबर लागावा या आशेने नंबर लावलेले नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

मुंबईत सध्या तीन दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.एका डोसात अकरा जणांचे लसीकरण होते.बाटली फोडल्यानंतर ती लगेचच वापरावी लागते अन्यथा लस वाया जाते.महापौर किशोरी ताई पेडणेकरांना याबाबतीत विचारले असता त्यांनी लसीकरणात कोणतेही राजकारण करायचे नसून लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद केल्याचे स्पष्ट केल.

मुंबईतील बीकेसी केंद्रातील डीननी पुढील आदेश मिळेपर्यंत लसीकरण बंद राहील असे जाहीर केल.दरम्यान राज्यातील सर्व केंद्रात लस पुरवठा सुरू केला असून नागपूरला 55000 डोस पुरवले गेले आहेत.

राज्यातील विविध शहरातील लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत.पैकी कोल्हापूर 200 केंद्र, पुणे 546केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यातील काही शहरात पुढीलप्रमाणे लस उपलब्ध आहे.1.रायगड 3780 2. चंद्रपूर 4100 3. सांगली 1300 4. सातारा 00 5. रत्नागिरी 1100 परिणामी केंद्र सरकार लस पुरवठा करत नाही तोवर लसीकरण बंद पडणार आहे.

राज्यात एकीकडे लॉकडाऊनला विरोध, मंत्र्यांचे राजीनामे, वाढती कोरोना रुग्णसंख्या, येऊ घातलेल्या निवडणुका यांमुळे जिकीरीच वातावरण आहे त्यातच लसीकरण बंद पडण्याची वेळ आली आहे.

देशातही कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असून अजून साडेपाच दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे.परिणामी लसींबाबत आणीबाणी झाली असून सिरम आणि भारत बायोटेक दोन्ही संस्थांना लसींची आॅर्डर दिली गेली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.