ऑक्सिजन साठी विमानाचा वापर करा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.

0

महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यात केंद्राने केलेल्या मदती मध्ये प्रवासाच्या मुळे मदत येण्यासाठी विलंब होत आहे. तसेच विमानांनी ऑक्सिजन आणणे शक्य नाही. मात्र यावर नामी उपाय काढन्याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रयत्न केला.

ब्रिटन मध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने तिथला संसर्ग हा मोठ्या प्रमाणात टाळता आला आहे. आपल्या इथल्या लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांची उत्पादन करण्याची क्षमता कमी आहे. यावर उपाय म्हणून आम्ही लस आयात करून लसीकरण वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करा असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

तसेच ऑक्सिजन जरीही इतर राज्यातून येत असला तरीही त्यात वेळ जातो आहे. हा वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर हे विमानाने प्लांटच्या ठिकाणी पाठवून पुन्हा आपल्याला वेळ वाचवता येऊ शकतो यावर मार्गदर्शन करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.