गांजलेल्या तोफेटून आलेल्या गोळ्यांना उत्तर देयचं नसतं, मात्र टप्प्यात आलं की कार्यक्रम करायचाच!

0

सोशल मीडियावर श्री. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या तीन वर्षांच्या कालावधीस पूर्ती झाल्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पुर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना स्पेशल शुभेच्छा देताना दिसत आहेत. श्री. जयंत पाटलांचे बोलणे फारच स्पष्ट आणि आक्रमक असते याचाच समावेश पोस्ट मधून दिसून येतो आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर आव्हानात्मक परिस्थिती असताना खा. शरद पवार यांनी ना. जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी २९ एप्रिल २०१८ रोजी जयंत पाटील यांच्यावर सोपवली.

पुरेपूर जबाबदारीला न्याय देण्याचे काम जयंत पाटील यांनी केलं. चांद्या पासून बांद्या पर्यंत पक्ष बांधणी पक्ष विरोधात असताना सुद्धा ताकतीने जयंत पाटील यांनी केली. महाराष्ट्रातील कित्येक दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना त्यांनी पक्ष बांधणी करण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ला मताच्या स्वरूपात दिसून आला.

“गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं”, “टप्प्यात आलं की कार्यक्रम करायचा”, आपल्या जबरदस्त स्टाईल मध्ये ‘thank you” म्हणण्याचे त्यांचे स्टेट्स अशा विविध डायलॉग टाकत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉटसअप अशा विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. शुभेच्छांचा वर्षाव उभ्या महाराष्ट्रातून होताना दिसत आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.