
केस पांढर होण ही वाढत्या वयातील समस्या आहे. परंतु काहीवेळी कमी वयातच केस पिकू लागतात. केस पिकल्यावर हल्ली डाय लावला जातो, बाजारात निरनिराळ्या रंगाचे डाय उपलब्ध असून ते १० मिनिटे ते अर्धा तास असे ठेवले जाते. हा डाय साधारण तीन आठवडे टिकतो. काहीवेळा १५ दिवसातच डाय निघून जातो. अशावेळी वारंवार डाय लावण चुकीच असून ते एक केमिकल आहे. काहीजणांना डायची एलर्जी येते. डोळे लाल होण, पुरळ येण अशा समस्या जाणवतात. यावर एक घरगुती रेमेडी आज आपण बघणार आहोत.
साहित्य :
१) कॉफी पावडर – २ ते ३ चमचे
२) चहापूड – १ चमचा
३) आवळा पावडर – १ चमचा
कृती :
चहापूड पाण्यात उकळा. साधारण पाच मिनिटे उकळा आता गॅस बंद करून पातेल खाली ठेवा. काॅफी पावडर २ चमचे केस मोठे असल्यास ३ चमचे घ्या, आता यात १ चमचा आवळा पावडर घाला दोन्ही मिक्स करा. आता यात चहापूडचे पाणी गाळून, थंड करून घाला. साधारण ९ ते १० चमचे, तयार मिश्रण केसाला डायप्रमाणे लावा व केस अर्धा तास तसेच ठेवून धुवा. पहिल्य्च वेळी फरक जाणवेल हा उपाय किमान ४ आठवडे करा.
वरील उपायात कॉफी उत्तम कंडीशनर असून केस चमकदार करते तर चहापूडीत अँटी आॅक्सीडंट, टॅनीन असल्याने तहामुळे केसात खाजणे तसेच कोंडा दूर होतो. आवळा पालडर परंपरागत उपाय असून त्याने केस वाढण्यास मदत होते तसेच त्याने केस काळे होतात, आवळ्याने केसांना पोषक तत्वे मिळतात.