द गर्ल ऑन द ट्रेन – एक खिळवून ठेवणारा चित्रपट

0

परिणीती चोप्राचा नवीन चित्रपट “द गर्ल ऑन द ट्रेन” २६ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट खूप रोमांचक आहे. या चित्रपटात आदिती राव हैदरी, अविनाश तिवारी आणि कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील खूनाच गूढ प्रेक्षकांना आपल्या ट्विस्टमध्ये कायम अडकवून ठेवण्यात यशस्वी ठरतो.

कथा
चित्रपटाच्या सुरवातीस परिणीती वकिलाच्या भूमिकेत दिसून येते. अविनाश तिवारी तिच्या पतीची भूमिका साकारत आहेत. दोघेही सुखी आयुष्य जगत असतात, परंतु एका अपघातात गर्भवती असलेली परिणीती आपले मूल गमावते. ज्यानंतर तिला स्मृतिभ्रंश होतो (ज्यामध्ये मनुष्य गोष्टी विसरण्यास सुरवात करतो).

दुसरीकडे, अदिती राव हैदरी आहे, तीला परिणीती परिपूर्ण आणि आनंदी मुलगी मानते आणि ट्रेनमधून तिला दररोज पाहते. एके दिवशी तिची हत्या केली जाते आणि परिणीतीला तिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असते. त्यानंतर ती पुरावे गोळा करायला लागते व आपल्याला स्मृतीभ्रंश असल्याचे लपवते. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी अगदी अचूक दिशानिर्देश दिले आहेत. चित्रपटाचे संपादन उत्कृष्ट आहे. १ तास ५२ मिनिटांच्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे संवाद नव्हे तर कलाकारांचा अभिनय आहे.

कीर्ती कुल्हारी शीख पोलीसच्या भूमिकेत दिसली आहे. तिचा लो मेकअप लूक तिच्या अभिनयाला आणखी मजबूत बनवत आहे. परिणीतीदेखील एका अत्यंत प्रखर भूमिकेत दिसली आहे. हा तिचा पहिला थ्रिलर चित्रपट आहे आणि अल्कोहोल ग्रस्त आणि स्मृतीभ्रंश रोगाशी लढण्याचा तीचा प्रवास चांगला दर्शविला गेला आहे.

हा चित्रपट थरारक आहे तसेच यात शेवटपर्यंत उत्कंठा ठेवली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संपादन इतके नेत्रदीपक आहे की प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुनाचा अंदाज लावणे कठीण होते. गाणी फारशी खास नाहीत, फक्त एका गाण्यामुळे स्त्रिया खूप भावनिक होतात आणि या गाण्याद्वारे कथा आणखी वर्धित केली जाते.

परिणीतीचा हा चित्रपट २०१५ मध्ये लिहिलेल्या कादंबरी आणि २०१६ मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूड फिल्म ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ याचे हिंदी रूपांतर आहे. थ्रिलर आणि गूढ चित्रपटांच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला अडकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.