शरद पवार घेणार मोठा निर्णय, अनिल देशमुखांच्या गृहमंत्री पदावर “गदा” येण्याची शक्यता

0

मुंबई : सध्या एनआयए कडून तपास सुरु असलेल्या, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरावे सापडल्याने, एनआयएने त्यांना अटक केली आहे. सचिन वाझेंच्या या अटकेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, अधिवेशनात वाझेंची पाठराखण करणारे सरकार, अशी जी महाविकास आघाडीची प्रतिमा विरोधकांनी बनवली होती. त्याला एकप्रकारे खतपाणी मिळाल्यासारखे झाले आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला यामुळे तडा गेला असून, जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा मलीन झाली असल्याची कबुलीच आज एकप्रकारे शरद पवार यांनी दिली. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी “वर्षा” या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांची ही भेट खाजगी नव्हती.

 

त्यामुळे आता खुद्द पवार यांच्याकडूनच डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्या या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिपदावर गंच्छती येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली, यात सचिन वाझे प्रकरणावरून चर्चा झाल्याची माहिती आहे, तसेच यात मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूत ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत, अनेक वेळा गृहमंत्री अनिल देशमुख सरकारची बाजू ठामपणे मांडण्यात अपयशी ठरल्याचं उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारबद्दल लोकांच्या मनात अविश्वास निर्माण होऊ नये आणि असे झाले तर याचा पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन अनिल देशमुख यांची या पदावरून गच्छंती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांच्या गृहमंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.