राज्यात या पाच जिल्हा परिषदात निवडणुकांच बिगुल वाजल ५ ऑक्टोबरला होणार मतदान

0

राज्यात गेल्या दड वर्षापासून कोरानाचा हाहाकार होता. परिणामी काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.लसीकरण झाल आणि जनजीवन सुरळीत झाल. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणूक स्थगित करण्यात आली होती.७ जुलै२०२१ रोजी होत असलेले मतदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी स्थगित केलं होतं. मात्र, आता स्थगित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता या निवडणुकांसाठी मतदान येत्या ५ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी मतमोजणी ही ६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं राज्य निवडणुक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितलं आहे.

पालघर जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ या दरम्यान नामनिर्देशनपत्रे उमेदवारांना दाखल करता येतील. त्याचबरोबर २१ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छननी होईल. पालघरसह सर्व ठिकाणी २१ सप्टेंबर २०२१ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशपत्रे मागे घेता येतील, असं निवडणुक आयोगाने सांगितलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.