आमदार रोहीत पवारांनी केली भाजपची कानउघडणी,कोरोनाची लढाई ही मानवतेची लढाई त्याच राजकारण करू नका.

0

राज्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि त्यामुळ येणारा आरोग्य व्यवस्थेवरील ताण यांमुळे रुग्ण आणि यंत्रणा यात विषम व्यवस्थापन होत रुग्णांना बेड कमतरता,रेमेडिसेव्हर तुटवडा अशा समस्यांना सामोर जाव लागत आहे.राज्यातील ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनसदृश्य निर्बंध लावले आहेत जेणेकरून कोरोनाची साखळी तुटून रुग्णसंख्या कमी होईल व साथीच्या फैलावाला अटकाव बसेल,परंतु यावरून भाजपन राज्यसरकारवर सातत्यान टिकेची झोड उठवली आहे व भाजपशासित राज्यात अशी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी सोदाहरण भाजपची कानउघडणी केली आहे.पंजाब,हरियाणा,उत्तर प्रदेश,बिहार,बंगाल,गुजरात,तामिळनाडू,केरळ या राज्यातही कोरोनाची स्थिती भयावह असून यापैकी सहा राज्यात भाजपची सत्ता आहे,त्यामुळ भाजपशासित राज्यात चांगल्या व्यवस्थापनामुळ कोरोना स्थिती नियंत्रणात आहे हा त्यांचा दावा फोल ठरत आहे.गुजरातमध्ये तर न्यायालयान सरकारला फटकारल आहे.उत्तर प्रदेशातही कोरानाची स्थिती चिंताजनक असून नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यामुळ तिथ रुग्णसंख्या अचानक वाढली आहे.बिहारमध्येही रुग्णांना रेमेडिसेव्हरऐवजी रेबिजची इंजेक्शन दिल्याच्या घटना समोर येत आहेत.बेड उपलब्ध नाहीत किंवा रुग्णांना मृतदेहासाठी आठ तास थांबाव लागल,मृतदेह हातगाड्यांवरून नेले अशा विदारक घटना समोर येत आहेत.रुग्णांचे होणारे हाल व त्यांच्या कुटुंबाची होणारी फरपट ह्रदय हेलावत आहे.अशा जागी राजकारण योग्य नसून माणुसकी गरजेची आहे.

रोहीत पवार म्हणाले,महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे आणि गैरसोयी होत आहेत मी मान्य करतो पण देवेंद्र फडणवीस सातत्यान राज्याची व्यवस्था कोलमडून पडली अशी टिका करत आहेत.त्यांनीही राजकारण न करता वास्तवदर्शी विचार करावा व राज्याला सहकार्य कराव.कोरोना चेन ब्रेक व्हावी तसेच रुग्णसंख्या घटून मृत्यूदर कमी व्हावा यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत,त्याला सातत्यान भाजप विरोध करत टिका करत आहे.अशावेळी भाजपन राजकारण करू नये.कोविडची लढाई ही मानवतेची लढाई असून त्यात सहकार्य अपेक्षित आहे.रुग्णांचा जीव वाचवण आपली पहिली जबाबदारी हे लक्षात घेऊनच निर्णय घेण्याची गरज आहे.असही रोहीत पवारांनी स्पष्ट केल.

रोहीत पवारांनी राज्यातील लसीकरणाचा आढावा देत लसीकरणात महाराष्ट्रच आघाडीवर असल्याची जाणीव करून दिली.राज्यात सध्या १कोटी ५लाख २९हजार लोकांच लसीकरण झाल असून त्यात पहिला डोस घेणारे ९५लाख २०हजार ७६५ लोक आहेत. तर दुसरा डोस घेणारे १०लाख ८हजार लोक आहेत.राज्यातील लसीकरण वाढवण्याच्या तरतुदी करण्यात आल्या असून प्रतिदिवस ६लाख लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे.रोहीत पवारांनी ही सर्व माहिती देत आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची झलक दिली आहे.संयमाच राजकारण आणि वस्तुनिष्ठ बोलण यातून रोहीत पवारांनी भाजपला राजकारण न करता सहकार्याच आवाहन केल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.