अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता, सांगली, जळगाव पाठोपाठ तिसऱ्या नगरमध्ये भाजपला धक्का!

0

अहमदनगर महापालिकेवरती महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा हा प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चपखलपणे वापरला जातो आहे. सांगली नंतर अहमदनगर मध्ये भाजपला शह देत महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाली आहे.  हा नवीन पॅटर्न राज्यभरात महाविकास आघाडी राबविणार याबाबतीत संशय नाही.

अहमदनगर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अहमदनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची, तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोघांचेही एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या सभेत दोघांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा केली.

अहमदनगर शहरातील महिलांच्या आरोग्यावर,  पाणी प्रश्नावर काम करणार असल्याचं पदभार स्वीकारल्यानंतर महापौरांनी सांगितल.  तर शहराला हिरवेगार करण्यासाठी काम करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षासाठी हा धक्का फार मोठा आहे सांगलीच्या नंतर आणि जळगाव पाठोपाठ ही तिसरी महानगरपालिका भाजपने गमावली आहे महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडी पॅटर्न यशस्वी ठरतो आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.