महाराष्ट्रात आजपासून लागू केली आहे नवी नियमावली

0

मुंबई : राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात भार येत असून, राज्यात अजूनही बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर इंजेक्शन्स यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच सोबत काही कडक निर्बंध देखील राज्यभरात लागू केले आहेत.

तरीही राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, करोना साथीने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन राज्यातील निर्बंध आणखी कडक केले आहेत. याबाबतचं अधिकृत पत्रक राज्य शासनानं जारी केलं असून, राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या नव्या निर्बंधांप्रमाणे राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नवे नियम लागू असणार आहेत.

 • राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.
 • (या वेळा सोडून संपूर्ण दिवसभर दुकानं बंद राहणार. मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल.)

 • राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील.
 • शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील.
 • क्रीडा संकुलं आणि स्टेडियम देखील बंद राहणार.
 • धार्मिक स्थळं बंदच राहतील.
 • धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांना परवानगी नाही.
 • विवाहासाठी केवळ २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी.
 • अंत्यसंस्कारासाठी केवळ २० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी.
 • सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील.
 • You might also like
  Leave A Reply

  Your email address will not be published.