आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी; ठाकरे सरकारकडून गाईडलाईन जारी

0

मुंबई : राज्यातील करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आज लॉकडाऊन संदर्भात नव्याने गाइडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत राज्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

 

 • उद्या रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. (नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड)
 • द्या रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील.
 • सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही परवानगी राहणार नाही.(संबंधित नाट्यगृह किंवा हॉलची मालमत्ता कोरोना काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.)
 • विना मास्क फिरणाऱ्यांना दंड आकारण्यात येणार आहे.(500 रुपये दंड)
 • उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.
 • लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
 •  होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.
 • दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
 • त्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी राहील.
 • भाविकांना मंदिरात दर्शनाची सुविधा ऑनलाईन  देण्यात यावी.
 • बंधनांसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल.(नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड)
 •  कोरोना रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर 14 दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
 • बाहेर 6 फुटांचे अंतर राखणे गरजेच आहे.
 • थुंकल्यास दंड वसुल करण्यात येणार आहे.
 • खासगी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असेही या आदेशात नमूद केलं आहे.
 • तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून, सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.

करोना साठी नव्याने जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यास आणि करोना बाधितांची संख्या अजून वाढल्यास शासनाला अजून कठोर पावले उचलावी लागतील असे देखील सरकारने सांगितले आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून, पूर्णतः लॉकडाऊन करण्याची गरज पडू नये यासाठी, करोना प्रतिबंधक नवे नियम गांभीर्याने पाळण्याची सूचना शासनाने नागरिकांना केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.