“हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल…”

0

मुंबई : एकीकडे करोनामुळे महाराष्ट्र धगधगत असताना, दुसरीकडे राज्यात रेमेडीसिवर वरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. याचे कारण शनिवारी रात्री रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्यां कंपन्यांपैकी एक असलेल्या ब्रूक्स फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते. या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी नेत्यांनी बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात मध्यरात्री धाव घेतली.

यांनतर दिवसभर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला तर, भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील यात उडी घेतली असून, त्यांनी भाजप नेत्यांना ट्विट करत, “ब्रूक्स फार्मा या कंपनीचे साठेबाजी करणे आणि औषधे काळ्या बाजारात विकणे त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरात मध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल…” असं म्हणत एक सणसणीत टोला लगावला आहे.

करोनाने राज्यात आपले हातपाय पसरायला परत सुरुवात केली आहे. राज्यात परिस्थती हाताबाहेर गेली असून, काल तब्ब्ल करोना बाधित रुग्णांच्या आकड्यामध्ये ६७ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे आणि एकाच दिवसात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.