उमस्नाबादमध्ये एकाच ठिकाणी एकाच दिवशी २३जणांवर अत्यंसंस्कार,मन सुन्न करणारी घटना

0

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यान वाढत असून गेल्या महिनाभरापूर्वी १०० च्या आसपास असणारी रुग्णसंख्या कालखेर ७६४ वर जाऊन पोहोचली आहे.जिल्हा प्रशासन कोरोना पसरू नये यासाठी कसोशीचे प्रयत्न करत असूनदेखील लोकांच्या ढिलाईमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.जिल्ह्यात कडक उन्हाळा आणि वाढती रुग्णसंख्या अशी दुहेरी अडचण दिसून येत आहे.

रुग्णसंख्या वाढल्यान निदानासाठी रांग लावावी लागत आहे इतकच नाही तर अहवाल यायलाही उशीर होत आहे.ही फरपट इथेच थांबत नसून उपचार मिळण्यासाठी रांग,बेड उपलब्ध व्हावेत म्हणून प्रयत्न, वेळेवर रेमेडिसेव्हर मिळाव म्हणून नातेवाइकांची धावपळ अशी परिस्थिती सर्व राज्यात दिसून येत आहे.या आजारामुळ रुग्णाला त्रास सहन करावाच लागत आहे परंतु तरतुदीत नातेवाइकही होरपळत आहेत.

उस्मानाबाद शहरात काल एकाच ठिकाणी,एकाच वेळी २३जणांचे अत्यंसंस्कार करण्यात आले.स्मशानभूमीतील ही दृश्य ह्रदय पिळवटून टाकत आहेत.स्मशानभूमी अपुरी पडू लागली आहे.आप्त स्वकियांना या रुग्णांचे अत्यंसंसकारही करता येत नाही आहेत.परिणामी लांबून किंवा डोंगरावर चढून काहीजणांनी अंत्यदर्शन घेत अश्रू सांडले आहेत.राज्यात लागलेले निर्बंध कोरोना साखळी तोडण्यास समर्थ ठरून रुग्णसंख्या कमी करणे आणि रुग्ण दगावण्यापासून वाचवणे अशी कामगिरी करू शकतात का?याचा सखोल विचार होऊन तातडीची पावल उचलली गेली पाहिजेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.