
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी वापरले जाणार नाही !
सोलापूर व इंदापूर पाण्याचा प्रश्नावरून चांगलेच राजकारण तापले आहे. लोकांनी आक्रमक होत आमचे पाणी पळवले अशी जाहीर टीका सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. विरोधकांनी या विषयाला हवा देण्याचे काम केलं. मात्र सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एकही थेंब पाणी वापरले जाणार नाहीत. तसेच पालकमंत्री पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे; आणि त्याचे मला निश्चित भान आहे असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मात्र कोणी कितीही खलनायक ठरवले तरीही आपण खरे नायक असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दत्तात्रय भरणे करताना दिसत आहेत. पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा उद्देश त्यांचा स्पष्टपणे दिसून येतो आहे. त्यावरून चांगलेच राजकारण पेटल्याचे उभ्या महाराष्ट्राला सध्या दिसून येत आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात पिंपरी चिंचवड व पुणे येथून वाहून येणारे प्रक्रिया केलेलं पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात मिळावे या साठी त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सर्व्हे करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. त्याचे काम प्रगती पथावर सुरू आहे.त्यामुळेच मी इंदापूर तालुक्यात हिरो तर सोलापूर मध्ये खलनायक ठरलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सोलापूर जिल्ह्याच्या एक थेंब पाण्याला हात लावणार नसल्याचे त्यांनी सांगितले.