
१मे पासून १८वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण जोरदार सुरू असून लसीकरणाचे टप्पे पाडले आहेत.सुरुवातीला ६०वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली होती.त्यानंतृ दुसरा टप्पा ४७वर्षांचा केला होता सध्या ४५वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू असून काहींचा पहिला तर काहिंचा दुसरा डोस सुरू आहे.भारत हा सर्वाधिक तरूणाई असणारा देश आहे या तरुणाईचा विचार करता यांचही प्रवाही लसीकरण होण जरुरी होत.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संबंधित तज्ञांची बैठक घेत या विषयावर चर्चा केली तसेच ४५वर्षाखालील १८वर्षापर्यंतच्या तरुण पिढीला लस देण्याबाबत सल्लामसलत केली त्यावर तज्ञ मंडळींनी या पिढीला लस देण्यास मंजुरी दिली असून या पिढीला १मेपासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.देशात सार्वत्रिक लसीकरण व्हावे तसेच लसीकरणाची गती वाढावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
१८वर्षाखालील मुलांना लस देण्यास मात्र अवधी असून याप्रकारची ट्रायल अमेरिकेत सुरू आहे.भारतानेही याबाबतीत पुढाकार घ्यायचा विचार केला असून १२वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरणाची परवानगी मिळवण्यात येणार आहे.लसीचे साईड इफेक्ट पाहूनच याप्रकारचा निर्णय घेण्यात येणार आहे.