फडणवीसांनी महाराष्ट्राला बदनाम केले – नाना पटोले

0

नागपूर : लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. पण केंद्र सरकार लसींचा पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे. देशातही कोरोना रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तान आणि इतर देशांना लस पाठवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना केंद्र सरकार महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर सिंग आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, असं स्पष्ट करत नाना पटोले यांनी भाजप आणि फडणवीस यांची खोटे बोल पण रेटून बोला, अशी भूमिका आहे. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण असो किंवा परमबीर सिंग प्रकरण असो फडणवीस यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले आहे, असा सणसणीत टोला लगावला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.