बीडमध्ये आॅक्सीजनचा तुटवडा कमी करण्यासाठी धनंजय मुंडेंनी परळीचा आॅक्सीजन प्लांट हलवला आंबाजोगाईला

0

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून मोठ्या प्रमाणावर आॅक्सीजनची कमतरता जाणवू लागली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना परिस्थिती तसेच उपाययोजना यांचा आढावा घेतला त्यात आॅक्सीजन तुटवड्याची अडचण समोर आली.धनंजय मुंडेंनी यावर चर्चा करून महावितरणाशी बोलणी केली व परळी येथील थर्मल पॉवर प्लांट मधील क्रमांक ८चा प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

थर्मल पावर प्लांटच्या प्लांट निर्मिती संचद्वारे ८६ हजार लिटर आॅक्सीजन हवेतून विलग करता येणार आहे,परिणामी अंबाजोगाई येथील एसआरटी रुग्णालयात २४तासात 300 जंबो सिलेंडर आॅक्सीजन तयार होऊन निर्माण झालेला आॅक्सीजनचा तुटवडा कायमचा संपणार आहे.परळी औष्णिक विद्युत केंद्रात पाण्यापासून वीज निर्मिती करताना पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये यासाठी हा प्लांट वापरला जातो.येथील क्रमांक६व ७चा प्लांट पूर्ववत सुरू राहणार असून क्रमांक ८चा प्लांट तेवढा अंबाजोगाईला हलवण्यात येणार आहे.

थर्मल प्लांट निर्मितीची साधनसामग्री प्रशासनाला मिळाली असून अधिकारी आव्हाड यांनी धनंजय मुंडेंच्या सूचनेनुसार एसआरटी येथे जागेची पाहणी केली आहे.प्लांट निर्मिती होऊन येत्या १०दिवसात येथे आक्सीजन तयार होऊ लागेल व आॅक्सीजनचा प्रश्न मिटेल अशी आशा आहे.

आंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यायालय(एसआरटी) येथील आॅक्सीजन रिकव्हरी करण्याची क्षमता २०हजार लिटर असून या तरतुदीमुळे बीड,अंबाजोगाई येथे आॅक्सीजन निर्मिती होऊन रुग्णांना वेळेवर आॅक्सीजन मिळून त्यांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.