
देवेंद्र फडणवीसांनी काळा बाजार केलेल्या ब्रुक फार्माच्या संचालकाला सोडवण्यासाठी दिवसरात्र एक केले.रोहीत पवारांची संतप्त प्रतिक्रिया
राज्यात मोठ्या प्रमाणावर रेमेडिसेव्हरचा तुटवडा होत असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची ससेहोलपट चालू आहे.रेमेडिसेव्हर वेळेवर उपलब्ध होत नसल्यान रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत असून सगळीकडे नकारघंटा मिळत आहे.तर काहीवेळा रेमेडिसेव्हर चढ्या दरात घ्यावे लागत आहेत.यावरून भाजपवर टिका होत असून त्यांनी फार्मा कंपनींन महाराष्ट्राला रेमेडिसेव्हर देऊ नये अस धमकावल आहे आशी टिका सर्वत्र सुरू आहे.
दरम्यान ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकनिया यांना रेमेडिसेव्हरचा काळाबाजार तसेच साठेबाजी यासाठी अटक करण्यात आली,त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी रात्रीतन पोलीस स्टेशन गाठत राजेश डोकनियांची सुटका केली.यावरून सर्वच स्तरातून भाजपवर टिका सुरू असून यावर भाजपची सारवासारव सुरू आहे.
आजवर जनतेच्या कल्याणासाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याने पाहिले पण आज महाराष्ट्राची जनता अडचणीत असताना या जनतेच्या कल्याणासाठी भांडण्याऐवजी काळाबाजार करणाऱ्या कंपनीसाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याला पहायला मिळतायेत, हे खेदजनक आहे. pic.twitter.com/pGXBiXT8Dm
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 19, 2021
रोहीत पवार यांनी याची दखल घेत भाजपचे नेते जनतेच्या प्रश्नासाठी धावण्यापेक्षा काळाबाजार करणार्यांसाठी दिवसरात्र एक करत आहेत अशी टिका केली आहे.रोहित पवार म्हणाले,जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवत संपूर्ण देश तुमच्या हातात सोपवला आहे त्याचा विचार करत कोरोनोसारख्या महामारीत लस आणि रेमेडिसेव्हरचा पुरवठा योग्य प्रमाणात करण गरजेच होत. तसेच जनतेचे प्रश्न सुटून जनता मोकळा श्वास घेत असताना मग भाजपन नेहमीप्रमाण आम्ही जनतेच किती भल केल अशी जाहिरातबाजी केली असती तरी चालल असत.
मुद्देसूद टिका करणार्या रोहित पवारांनी यावेळीसुध्दा भाजपवर भाषेची मर्यादा राखत जनतेच्यादृष्टीन सकारात्मक ठरावी अशीच टिका केली आहे.