मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच भूमिपूजन

0

येत्या १७ तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असून त्याचे औचित्य साधत संभाजीनगर जिल्हापरिषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आयोजित केलेल आहे. हे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही इमारत पालघरच्या जिल्हा परिषद इमारतीच्या धर्तीवर होत असून सुमारे 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.वर्षभरात ही इमारत जलदगतीने उभी राहील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच दिवशी पैठण येथील ‘शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज संतपीठा’चे लोकार्पणही करतील अशी माहिती रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. शनिवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासोबत संतपीठ इमारतीतील सुविधांची पाहणी रोहयो व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विलास भुमरे उपस्थित होते.१९८० पासून हा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रकल्प रेंगाळत पडला होता. रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला.

मंत्री भुमरे म्हणाले की, ‘आधुनिक गुरुकुलाची संकल्पना असलेल्या या संतपीठात सदाचार आणि चारित्र्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारी एक नवीन पिढी या आधुनिक गुरुकुलातून घडवली जाणार आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.