संपर्क येताच या पानांची पाण्यात उकळून वाफ घ्या क्षणात श्वास होईल मोकळा फुफुस होईल कार्यक्षम निरोगी

0

भारतीय आर्युवेद श्रेष्ठ असल्याचे सर्व जगाने मान्य केलेल आहे. आर्युवेदात प्रत्येक आजारावर औषधे उपलब्ध असून ही औषधे चूर्ण, काढा, वाफ, भस्म अशा स्वरुपात दिली जातात. आर्युवेदात पंचेंद्रियांचा सखोल अभ्यास केला गेलेला आहे. सद्यस्थितीत अनेक विषाणूजन्य आजार पसरत असून त्याच्या संपर्कात येताच आपल्याला सर्दीसारखा विकार होतो. या विकारात नाक चोंदते किंवा वाहते. या दोन्ही प्रकारात आपण एक सोप्पा घरगुती उपाय पाहणार आहोत.

विषाणूजन्य आजाराच्या संपर्कात येऊ नये याची खबरदारी घेताना शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते. परंतु काहीवेळा विषाणू आपल्या श्वसन नलिकेवर हल्ला करतात त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. हा संसर्ग पुढे फुफुसापर्यंत जातो व आॅक्सिजन पातळी कमी होते. परिणामी नाक चोंदल्यास सतत त्रास होत राहतो. या समस्येवर एक घरगुती उपाय असून तो सहजसाध्य व प्रभावी आहे. आर्युवेदात या उपायाला महत्व देण्यात आले आहे. या उपायात आपण निलीगिरीची पाने वापरायची आहेत. निलगिरीचे तेल किंवा सौंदर्यप्रसाधने आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो, तर याच निलगिरीची पाने घ्यायची आहेत व ती पाण्यात टाकून उकाळायची आहेत. पानांचा सुंगंध दरवळू लागेल व पाण्यावर वाफ येऊ लागेल, अशा पाण्याची किमान ७ ते ८ मिनिटे तोंडावर कापड झाकून वाफ घ्यायची आहे.

निलगिरीच्या वाफेने चोंदलेले नाक त्वरित मोकळे होते. शरीरातील बॅक्टेरिया यांमुळे नष्ट होतात. तसेच नाकावाटे वाफ आत गेल्याने श्वसन नलिकेतील टॉक्सिक घटक नष्ट होतात. परिणामी श्वसन समस्या सुधारते. या वाफेमुळे घशातील तसेच फुफुसातील इन्फेक्शन दूर होते. घशातील खवखव थांबते व आॅक्सिजन पातळी सुधारते. हा उपाय आठवडाभर केल्यास तुम्हाला चांगले रिजल्ट मिळतात.

मित्रांनो वरील उपाय जरुर करा तसेच वेळोवेळी तज्ञांचा सल्ला जरुर घ्या. उपाय आवडल्यास अशीच जगभरातील रंजक माहिती मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.लेख जरुर शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.