अजित पवारांनी घेतली चक्क शिवसेना शाखेत बैठक

0

येत्या १७ तारखेला राज्यात पंढरपूर पोटनिवडणूक होणार असून गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादीन पंढरपूर,मंगळवेढा इथ सभांचा धडाका लावला आहे.दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकार असून राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आय आणि शिवसेना सत्तेत आहे.पंढरपूर पोटनिवडणूक राष्ट्रवादीचे भारत भालके यांच्या कोरोनान झालेल्या मृत्युमुळे लागली असून राष्ट्रवादीन भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे.

पंढरपूर निवडणुकीचा गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहता येथे नेहमी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे कींवा मग काँग्रेसने बाजी मारलेली आहे.भाजपन हा मतदारसंघ अजूनतरी काबिज केलेला नाही.परिणामी समाधान अवताडेंना उमेदवारी देत भाजप हा राष्ट्वादीचा विजयी बालेकिल्ला जिंकण्यास उत्सुक आहे.परंतु राष्ट्रवादीन ताकदीनिशी या निवडणुकीची तयारी केलेली असून दूर गेलेल्या कल्याण राव काळेंना परत बरोबर घेत बाजू बळकट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व काँग्रेस आय यांनी मिळून एकत्ररित्या प्रथमच ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे.अपक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले उमेदवार उभे केलेत खरे पण ते फक्त मत विभक्तिकरण करतील.प्रमुख टक्कर भाजप विरुध्द राष्ट्रवादी अधिक महाविकास आघाडीतील पक्ष अशीच राहील अशी दृश्य चिन्ह आहेत.

अजित पवार आज पंढरपूर दौरा करत असून त्यांनी आघाडी धर्मावर विश्वास ठेवत चक्क शिवसेनेच्या शाखा कार्यालयातच नेत्यांची बैठक घेतली.ही बैठक मंगळवेढा तालुक्यातील कार्यालयात झाली.बैठकीत त्यांच्याबरोबर दत्तात्रय भरणेंसह कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.अजितदादांनी ही बैठक घेत सगळ्याच माध्यमांना अचंबित करत शिवसेनेला सुखद धक्का दिला आहे.पंढरपूर निवडणुकीत शिवसेना अर्थातच भगिरथ भालकेंचा प्रचार करत आहे.अजित दादा पवार स्वताच्या धोरणी राजकारणासाठी ओळखले जातात.यानिमित्ताने भगिरथ भालकेंच्या अंगाला गुलाल लागण्याची वाट महाविकास आघाडी सरकार बघत आहे हे मतदारांच्या चांगलच लक्षात आल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.