
सुप्रीताईंमुळे जम्मू काश्मीरला अडकलेले महाराष्ट्रातील ३१ प्रवासी स्वगृही परतणार !
जम्मू काश्मीर येथे सहलीसाठी गेलेल्या ३१ यात्रेकरूंना खा. सुप्रिया सुळे यांनी मदत केल्याने पुढील प्रवास सुरू झाला आहे. पटास येथील डॉ.विकास वैद्यनाथ यांचे संपूर्ण कुटुंब व अन्य सह प्रवासी १० – ११ महिलांसह वयोवृध्द नागरिक होतें. महाराष्ट्रात सध्या पूर्णतः लॉक डाऊन आहे.
अमृतसर येथे हे सगळे प्रवासी १५ एप्रिल रोजी पोहचले होते. जम्मू काश्मीर, वैष्णवी देवी अशा विविध ठिकाणी त्यांनी पर्यटन केले. गुलमर्ग आणि पहलगाम येथे भेट देऊन ते जम्मुला जाण्यासाठी निघाले असता त्यांना कोझिंगुड येथे वाहतूक पोलिसांनी अडवून सांगितले की इथे कर्फु लागला आहे. पुढे जाता येणार नाही.
अशा अडचणीच्या वेळी डॉक्टर यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. आणि सविस्तर वृत्तान्त सांगितला. तत्काळ सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून तिथल्या स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्यास सांगितले ताबडतोब सगळी यंत्रणा कामाला लागली. तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात्रेकरूनच्या कागदपत्राची माहिती घेत त्यांना सहकार्य केले.
“खा.सुप्रिया ताई सुळे यांचे सुद्धा कार्य हे शरद पवार साहेब यांच्या सारखेच आहे. कधीही हाक मारल्यास त्या मदतीसाठी तयार असतात. आम्ही फोन करताच तातडीने सूत्र हलली. आम्हा सर्व सहकार्यांच्या तीन साडे तीन तास अडकून पडलेल्या गाड्या तत्काळ सोडण्यात आल्या. या साठी सुप्रिया ताई सुळे यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत”.
– डॉ. विकास वैद्य
यांनी अशी प्रतिक्रिया देत सुप्रिया ताई यांचे आभार मानले आहेत.
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.