
महाराष्ट्रातील तरुण आमदाराचा थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्याना सवाल!
लातूर ग्रामीण चे आमदार धिरज देशमुख यांनी केंद्र सरकारच्या दुपट्टी भूमिकेवर ठाम भूमिका घेत टीका केली आहे. याच बरोबर त्यांनी हे सुध्दा सांगितले की लोकांमधे गैरसमज, गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून आज मी ही माहिती सर्वांना देतो आहे.
“मिळालेल्या डोसेस पैकी नागरिकांना लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये देशात जी 6 राज्ये आघाडीवर आहेत, त्यात एकही राज्य भाजप शासित नाही, हे तरी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. खरंतर ही वेळ राजकीय चिखलफेक करण्याची नाही, मात्र खोटी माहिती प्रसारित होऊन सर्वसामान्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ही माहिती मला समोर आणावी लागली”. असे धीरज देशमुख म्हणाले आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्राला १८ तारखेच्या पत्राच्या माध्यमातून सूचना केल्या होत्या. त्या पत्रावर राजकीय शेरेबाजी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केली होती. त्यांच्या राजकीय टीके वर सविस्तर उत्तर देत असताना आकडेवारी सहित माहिती देऊन पोलखोल केली आहे.