‘बॅक टू स्कुल’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा दिमाखात संपन्न.

0

‘बॅक टू स्कुल’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्याला कलाकारांसोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैय्या भोसले आणि विद्यमान आमदार महेशदादा लांडगे तसेच नगरसेविका सोनाली गव्हाणे उपस्थित होते. या चित्रपटात सोनाली गव्हाणे, मेघराज भैय्या भोसले आणि महेशदादा लांडगे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी ‘बॅक टू स्कुल’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र चित्रपटातील कलाकार, चित्रपटाची कथा, प्रदर्शनाची तारीख याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.

चित्रपटाचे पोस्टर आणि नावावरून हा चित्रपट नक्कीच शाळेच्या अविस्मरणीय आणि गोड आठवणींना उजाळा देणारा असणार हे दिसून येते. रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या ‘बॅक टू स्कुल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अमित बेंद्रे, सुदर्शन रणदिवे,अमृता पाटील, अमृत झांबरे, किरण झांबरे, प्राची फुगे, दिपक गडदे यांनी  काम केले आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने निशिगंधा वाड बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटा सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण ,सुरेशविश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल इत्यादी अनेक कलाकार भूमिका निभावताना दिसणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.