फिरकीपटू हरभजनसिंग म्हणतो महाराष्ट्रात लॉकडाऊन कराच

0

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून मुंबई,पुणे यांसह विदर्भ,मराठवाड्यात गंभीर परिस्थिती आहे.राज्यात कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ आढळल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.दुसर्या लाटेची लक्षण वेगळी असून रुग्ण ओळखत कठीण जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात नवी नियमावली जाहीर केली असून संचारबंदी जाहीर केली आहे, काही ठिकाणी लॉकडाऊन लावला आहे.गर्दी नियंत्रणासाठी कडक निर्बंध आखले आहेत.लसीकरणाचा वेग वाढवला आहे.नागरिकांना मास्क,सॅनिटायजर वापरणे यासाठी आग्रह धरला जात आहे, अँटीजेन टेस्ट सुरू आहेत तरीही रुग्णसंख्या वाढत असून देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 60टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना “नागरिक नियमांच काटेकोरपणे पालन करत नसल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.हे जर असच सुरू राहील तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल” अस विधान मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केल होत.एएनआय या खाजगी वृत्तसंस्थेने मुख्यमंत्री ठाकरेंच हे वाक्य ट्विट केल होत.

या ट्विटला रिप्लाय देत भारताचा फिरकीपटू हरभजनसिंग याने एक ट्विट केल असून त्यात तो म्हणतो की, लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच.”लोक मुद्दयाच गांभीर्य समजून कधी लागणार हेच कळत नाही.”असा संताप हरभजनसिंगने व्यक्त केला आहे.महाराष्ट्रात रविवारी 40000 रूग्ण आढळून आले होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.