
पंतप्रधान मोदी 75 वर्षांतील सर्वात बेजबाबदार पंतप्रधान नाना पटोलेंची टिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांतील सर्वात बेजबाबदार पंप्रधान असल्याची टिका नाना पटोले यांनी केली.देशात कोरोना रुग्णसंख्या वाढली असून करोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे,कोरोनामुळ होणारा मृत्यू दर भयावह आहे.
गुजरात,पंजाबसह इतर राज्यातही कोरोना आपले हातपाय पसरू लागला असताना प्रधानमंत्रींनी मात्र जनतेला रामभरोसे सोडत 5 राज्यात लागलेल्या निवडणुकांच बिगुल वाजवल आहे.
पंतप्रधान जागोजाग सभा घेत,मोठी गर्दी करत फिरत आहेत.कोरोनाची नियमांची पायमल्ली करत आहेत.गुजरात राज्याला तर न्यायालयानही फटकारून झाल आहे.
नाना पटोले म्हणाले,पंतप्रधान मोदी देशाच कोणतही पालकत्व निभावत नसून ते अतिशय बेजबाबदार आहेत.सर्वांना सोशल डिस्टन्सींग,हात धुणे,मास्क असा पाठ पढवणारे पंतप्रधान मोदी स्वता मात्र मास्क घालत नाहीत.
त्यांच्या सभांमध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडतो.अशाप्रकारे पंतप्रधान दिशाभूल करत आहेत.देशात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक योजना,लस,रेमेडिसेव्हर यांकड लक्ष देण गरजेच आहे.
दरम्यान सध्या बंगाल,तामिळनाडू येथे निवडणुका सुरू आहेत,पंतप्रधान मोदी तसेच भाजपच्या इतर राष्ट्रीय नेत्यांनी या ठिकाणी सभांचा,पायी प्रचाराचा धडाका लावला होता.