महाराष्ट्रातील पोलीस शिपाई सुद्धा होणार पी एस आय : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

0

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलामध्ये शिपाई म्हणून भरती झालेला पोलीस कर्मचारी आता पोलीस दलामध्ये पीएसआय होऊ शकेल. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरती दिली आहे.

दिलीप वळसे पाटील ट्विट करत म्हणाले की “पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली’.

आत्तापर्यंत पदांची संख्या, आरक्षण, पात्रता असे विविध निकष लावत पोलिसांचे प्रमोशन होत असायचे. मात्र आता हे निकष असतीलच मात्र सामान्य पोलीस दलामध्ये रुजू झालेल्या पोलिसाला पीएसआय पदापर्यंत या नव्या प्रस्तावानुसार जाता येणार आहे. या प्रस्तावाला या अधिवेशना मध्ये मंजुरी मिळाली तर हा पोलीस खात्यांमधील महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.