‘पडळकराचे अंग माणसाचे आणि तोंड डुकारचे’ !

0

पडळकर यांनी शरद पवार यांच्या वरती केलेली टीका महाराष्ट्रातील जनतेला रुचलेली नाही सर्व स्तरांमधून गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला जातो आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा कसलाही मान न ठेवता गोपीचंद पडळकर यांनी अशी अतिशय गलिच्छ भाषा वापरत शरद पवार यांच्यावरती टीका केली होती. पडळकर यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराने त्याच भाषेमध्ये उत्तर दिले आहे.

‘पडळकराचे अंग माणसाचे आणि तोंड डुकारचे आहे. त्याला इकडे तोंड घालायची सवय लागली आहे. त्यांनी गटरामध्ये लोळण बंद केले पाहिजे. मला एकाने सांगितले आहे दोस्ती करायची तर चांगल्याशी करायची, डुकारशी केली तर सगळी घाण अंगाला लागते. जर पडळकर जास्तच रस्त्यावर आला तर आम्ही आदिवासी आहोत डुकराची शिकार करण्यात आम्ही तरबेज आहोत.’ अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. आमदार डॉ. किरण लहामटे पहिल्यांदाच इतके आक्रमक झाल्याचे सर्वांना दिसून आले.

राधा देशभरामध्ये वाढलेल्या इंधनाच्या किमती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.