
राष्ट्रवादी काँग्रेस कडून इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यभरात आंदोलन!
पेट्रोल डिझेल आणि गॅस यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशातील महागाईचा नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहे. यावरती केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही. या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र भरात आंदोलन करण्यात आले व निषेध करण्यात आला.
पेट्रोल ने शंभरी पार केली आहे तर डिझेल शंभराच्या जवळपास आहे याचीच काय कमी तर गॅसचे हिदर पंचवीस रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनता या महागाईमुळे मेटाकुटीला आली आहे याच गोष्टीच्या निषेधार्थ पक्षातर्फे पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर शाई फेकून संताप व्यक्त करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळातही दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत.