
आमदार निलेश लंके : काय म्हणावं या माणसाला, पहा व्हिडिओ…
कोरोना मध्ये लोकांसाठी धावणे गरजेचं आहे. सोबतच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी की अडचणी मध्ये सहकार्य करावं अशा द्विधा मनःस्थितीत लोक दिसून येतात. मात्र लोकप्रतिनिधीनेच स्वतः कामाला सुरुवात केली, भूमिका घेतली तर त्याचे लोक अनुकरण करत असतात.
आ.निलेश लंके यांनी मतदारसंघात कोविड सेंटर सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या साठी व्यवस्था केली आहे. रुग्णांना चांगला आहार, चांगले उपचार मिळावेत याकडे निलेश लंके जातीने लक्ष देत आहेत. अशा परिस्थिती मध्ये आदर्शवत असे त्यांचे काम सुरू आहे.
लोकांनी रुग्णांच्या बाबतीत मनामध्ये कसलीही भीती बाळगू नाही. तसेच अशा अडचणीच्या काळात लोकांना सहकार्य करावं या बद्दल अा. निलेश लंके यांनी कोविड सेंटर मध्ये रुग्णांना दिले जाणारे जेवण केले. त्याचा दर्जा तपासून पाहिला. तसेच रुग्णांच्या बाबतीत भीती न बाळगता सहकार्य करायला लोकांनी समोर यावं असा अप्रत्यक्ष संदेश दिल्याचे दिसून येते. ज्या ठिकाणी लोकांना जायला भीती वाटते तिथे जाऊन परिस्थिती पाहणे, जेवण करणे, आणि रुग्णांना दिलासा देणे ही फार मोठी गोष्ट आहे.