टास्क फोर्स सोबत बैठक सुरु, आज राज्यातल्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता- टोपे

0

मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.

राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन काल, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आज होत असलेल्या टास्क फोर्स सोबतच्या बैठकीनंतरच राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यामंशी बोलताना स्पष्ट केले आहे.

तसेच टोपे यांनी आज किंवा उद्या लगेच लॉकडाऊन लागणार, असे होणार नसून, संपूर्ण नियोजन झाल्यानंतरच लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असंही सांगितलं. तसेच काल मुख्यमंत्र्यांनीही, संसर्ग थांबवायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली.

त्यामुळे राज्यात ८ किंवा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची तीव्र शक्यता असून, आज सुरु असलेल्या टास्क फोर्स बरोबरच्या बैठकीत राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा होणार आहे, यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.