निपाणी शहरात प्रभाग क्र. 31मध्ये भाजपच डिपॉझिट जप्त

0

संपूर्ण निपाणी शहरात प्रतिष्ठेची ठरलेली प्रभाग क्रमांक 31 मधील पोटनिवडणूक माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांच्या पत्नी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुनीता गाडीवड्डर यांनी 482 मताधिक्याने जिंकली.निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, “प्रभाग क्रमांक 31मधील पोटनिवडणूक जिंकण्यासाठी पालिकेतील सत्तारूढ गटाने सर्व डावपेच आखले परंतु जनतेने सामान्य,धडपड्या उमेदवाराला मत देत विजयी केले आहे.

दरम्यान निपाणी नगरपालिका सभागृहात सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली.निवडणूक अधिकारी जी. डी मंकाळे, सहायक निवडणूक अधिकारी बाबासाहेब माने, शिरस्तेदार अभिषेक बोंगाळे यांनी ईव्हीएम मशीन सुरू करून मतमोजणीला सुरुवात केली सुरुवातीपासूनच आघाडी घेत सुनिता गाडीवड्डर यांनी 1368 पैकी 904 मते घेऊन विजय संपादन केला.या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दत्ता जोत्रे यांना 22 मते मिळाली.तर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार सुनील गाडीवड्डर यांना 11मते मिळाली.तसेच अपक्ष डॉ.संगीता येडनाईक यांना 27 मते मिळाली.

निकालाची बातमी हाती येताच गाडीवड्डर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करत बुधवारीच रंगपंचमी साजरी केली.दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वॉर्डातून मिरवणूक काढण्यात आली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.