शहर सुशोभिकरणांतर्गत आमदार रोहित पवारांचा अनोखा उपक्रम!

0

लोकाभिमुख कामाच्या बाबतीत पवार कुटुंब कायम महाराष्ट्रात दिशादर्शक राहिले आहे. अशाच कामाच्या बाबतीत सध्या आ. रोहित पवार चांगलेच चर्चेत आहेत. माझा मतदारसंघ हा मला राज्यातील मॉडेल म्हणून उभा करायचे आहे असे ते निवडणूक प्रचारात सांगत होते. मात्र सध्या विविध लोकोपयोगी कामे त्यांनी जोमाने सुरू केली आहेत. त्यांच्या कामाच्या बाबतीत महाराष्ट्रभरातून चर्चा सुरू असते.

कर्जत जामखेड शहर सुशोभिकरणांतर्गत जामखेडमध्ये पुण्यातील आर्टिस्ट निलेश हे भिंतींवर महापुरुषांची चित्र काढत आहेत. त्यांनी विविध महापुरुषांची चित्रे काढली आहेत. असेच अचानक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि योगायोगाने शाहू महाराजांचं चित्रं रेखाटण्याचं काम सुरू असणाऱ्या ठिकाणी आ. रोहित पवार यांनी भेट दिली. महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम ते सध्या करत आहेत. तसेच महापुरुषांचे विचार हे लोकांत आत्मसात झाले पहिते. त्यांचे प्रतीके निरंतर समोर असतील तर महापुरुषांचे आदर्श घेऊन लोक चांगली कामगिरी करतील हे निश्चित आहे.

आ. रोहित पवार सामाजिक कामाच्या बाबतीत सतत राज्यभरात सक्रिय असतात. तरुणांच्या मनातील महाराष्ट्र घडवण्याचे काम हे रोहित पवार करत आहेत अशी लोकांत मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळते!

Leave A Reply

Your email address will not be published.