अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार ऋतुराज पाटील यांची अनोखी मदत!

0

कोल्हापूर दक्षिणचे तरुण आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहरातील कोरोना सेंटरमध्ये दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधी साठी दोन लाख शेणी दान केल्या आहेत. पंचगंगा नदीवरील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी बाहेरून सुद्धा मृतदेह येतात. अंत्यसंस्काराच्या वेळी शेणीची पैसे देऊन सुद्धा शेणी उपलब्ध होत नाही. यावर उपाय म्हणून ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेत मतदारसंघातील नागरिकांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला जनतेतून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून एक लाख शेणी देण्याचे नियोजन असल्याचे अा. ऋतुराज पाटील यांनी सांगितले. मात्र लोकांनी त्यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत तब्बल कोल्हापूर दक्षिण मधून दोन लाख शेणी देणार येणार असल्याचे सांगितले आहे. तरुण आमदार ऋतुराज पाटील सामाजिक कार्यात कायम सहभागी होत असतात. त्यांनी स्वतः चा जबाबदारीने लक्ष देऊन हे सहकार्य केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.